आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:एनपीएस योजनेविरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन

सिन्नर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अर्थात एनपीएस राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अहितकारक असून ही योजना हटवून जुन्या पेन्शन योजनेचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावा, या मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रवेशद्वारावर मंगळवारी धरणे आंदोलन केले. एकच मिशन, जुनी पेन्शन, एनपीएस हटाव अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालय दणाणून सोडले.

पुरवठा विभागाचे निरीक्षक विशाल धुमाळ, महसूल सहायक सविता सानप, सागर वाघमारे, प्रगती पेंदाम, भगवान काकडे, रतिलाल सोनवणे, अव्वल कारकून सीमा गव्हाळे, अनिता गावित, निवृत्ती बर्वे, मुरलीधर चौरे, पंकज सोनवणे, शिपाई कैलास तूपसुंदर, सुधाकर भार्गवे, बाळू गवारे, दामोदर पगारे आदींसह अधिकारी, कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाली होते. एनपीएस योजनेसंदर्भात राज्य सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी मध्यवर्ती संघटनेने पुढाकार घेतला आहे.

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नाशिक जिल्हा शाखेच्या वतीने २१ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत एनपीएस हटाव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यस्तरावर हे आंदोलन होत आहे. सप्ताह कालावधीत जिल्हा, तालुका पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी जेवणाच्या सुट्टीत एकत्रित येऊन कार्यालयाच्या दर्शनी भागात एनपीएस हटाव संदर्भात बॅनर लावून या योजनेचा निषेध केला.

बातम्या आणखी आहेत...