आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसाधारण सभा:कळवाडी, सौंदाणेत लवकरच शेतीमाल खरेदी-विक्री केंद्र; शेळके यांची माहिती

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाजार समितीच्या कामकाजात सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. कळवाडी व सौंदाणे येथे शेतीमाल खरेदी-विक्री केंद्र कार्यान्वित करण्यासाठी बाजार समितीकडून आवश्यक कार्यवाही होत आहे. संबंधित खात्याची परवानगी मिळताच दोन्ही ठिकाणी खरेदी व विक्री केंद्र सुरू केले जाणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक जितेंद्र शेळके यांनी दिली. बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच शेळके यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. भाजीपाला व फळफळावळ विभागात सुधारणा केली जाणार आहे. कर्मचाऱ्यांना ड्रेसकोड लागू केला जाईल. शासनाचे थकीत अंशदान, सुपरव्हिजन फी भरल्यानंतर बाजार समितीच्या आवारात आवश्यक सुविधा पुरविणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शेतकरी माेठ्या सं‌ख्येने उपस्थित हाेते.

बातम्या आणखी आहेत...