आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व अर्ज वैध:सिन्नरला 12 ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्यपदाचे सर्व अर्ज वैध

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छाननी प्रक्रियेत १२ ग्रामपंचायतींसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या सरपंच व सदस्यांचे सर्व अर्ज वैध ठरले. एकही अर्ज अवैध ठरला नसल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी दिली. सरपंचपदासाठी शहा येथे सर्वाधिक १३, पाटपिंप्रीत सर्वात कमी २ उमेदवार रिंगणात आहेत.

कृष्णानगर येथे सरपंच पदासाठी १० तर तीन प्रभागातील सदस्य पदासाठी १४, आशापूर येथे सरपंच पदासाठी ६, तीन प्रभागात सदस्य पदासाठी १४, शहा येथे सरपंच पदासाठी १३, चार प्रभागात सदस्य पदासाठी ३६, वडगाव पिंगळ्यात सरपंच पदासाठी ८, चार प्रभागात सदस्य पदासाठी ४७, शास्त्रीनगर येथे सरपंच पदासाठी ७, सदस्य पदासाठी तीन प्रभागात ४६, ठाणगाव येथे सरपंच पदासाठी ७ आणि पाच प्रभागात सदस्य पदासाठी ३१, नांदूरशिंगोटे येथे सरपंच पदासाठी ४, पाच प्रभागात सदस्य पदासाठी ४४, सायाळे येथे सरपंच पदासाठी ४ आणि तीन प्रभागात सदस्य पदासाठी २५, पाटपिंपरीत सरपंच पदासाठी २ आणि तीन प्रभागात सदस्य पदासाठी २२, कीर्तांगळीत सरपंच पदासाठी ६, तीन प्रभागात सदस्य पदासाठी ३०, उजनी येथे सरपंच पदासाठी ५, तीन प्रभागात सदस्य पदासाठी २६, कारवाडीत सरपंच पदासाठी ७ आणि तीन प्रभागात सदस्य पदासाठी २५ नाम निर्देशन पत्र शिल्लक राहिले आहेत.

७ डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत असून त्यानंतर चिन्ह वाटप होऊन अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. सध्या बारापैकी एकट्या पाटपिंप्रीचा अपवाद वगळता सर्वच गावांमध्ये सरपंच पदासाठी बहुरंगी लढतीची चिन्हे आहेत. पाटपिंपरीत केवळ दोन उमेदवार असल्याने तेथे दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सदस्य पदासाठीही एका जागेवर तीन ते चार, काही ठिकाणी ७-७ उमेदवार नशीब आजमावत आहे.

माघारीनंतरच चित्र स्पष्ट
७ डिसेंबरपर्यंत माघारीची मुदत देण्यात आली असून त्यानंतरच या १२ ग्रामपंचायतींचे निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...