आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:मनमाडला रात्री 11  नंतर सर्व दुकाने बंद

मनमाड20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथे आता रात्री ११ नंतर शहरात सर्वत्र सामसूम होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिस प्रशासनाच्या या भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे. तर छोट्या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली. रात्री ११.३० नंतर आस्थापना, हॉटेल बंद ठेवण्याचा शासनाचा निर्णय आहे. या निर्णयाची अंमलबजावणी शहरात पोलिस प्रशासनातर्फे सक्तीने केली जाणार आहे. व्यावसायिकांनी रात्री ११ नंतर आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईनंतर हॉटेल व तत्सम व्यावसायिकांची दुकाने बंद झाली. चौकात, ओट्यावर गप्पा मारणाऱ्यांवर पोलिसांनी जरब बसवली त्यामुळे ११.३० नंतर शहरात सामसूम दिसून येते. या कृतीमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल गुन्हेगारी घटना कमी होतील, अशी अपेक्षा आहे. नागरिकातून या भूमिकेचे स्वागत केले आहे. तीन -चार दिवसांपासून पोलिसांच्या या धडक कारवाईने रात्री ११ नंतर शहरात सामसूम दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी रात्रीची गस्त कडक केली आहे.

बातम्या आणखी आहेत...