आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गदत्त:कविता कवीत निसर्गदत्त असली तरी तिला पैलू पाडावेच लागतात

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कविता कवीत निसर्गदत्त असली तरी तिला काही पैलू पाडावेच लागतात, हे करीत असताना तिचे अस्सलपण जपावं लागतं, तरच ती जनमान्य कविता ठरते, असे मत ज्येष्ठ कवयित्री डाॅ. राजश्री देशपांडे (सातारा) यांनी व्यक्त केले.

येथील मनमाड जनहित विकास संस्था, कलाक्षर साहित्य रसिक मंच व साहित्याक्षर प्रकाशन यांच्या वतीने आयोजित केलेल्या बरखा कविता उत्सवांतर्गत झालेल्या ‘कवी समजून घेतांना...!’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

देशपांडे यांनी माणसाचे मन व्यक्त व अव्यक्त अशा दोन पातळ्यांवर कार्य करीत असते व भाव-भावनांचा स्तर रचत असते. यातून तीव्रपणे येणारे विचार कवीला लिहतं करीत असतात. सुरुवातीला त्यांनी त्यांच्या ‘अन्वयाची अक्षरलिपी’ या काव्यसंग्रहातील काही कविता सादर केल्या. प्रसिद्ध लेखक डाॕॅ. संजय बोरुडे हे या कार्यक्रमाचे सूत्रसंवादक होते.

पत्रकार अशोक परदेशी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत केले. तर कवी हेमंत वाले यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. येथील महात्मा ज्योतीराव फुले वाचनालय सभागृहात या बरखा कविता उत्सवांतर्गत दुसऱ्या सत्रात ‘पाऊस-कविता’ हे खुले कविसंमेलन ज्येष्ठ कवी प्राचार्य सदाशिव सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

पाऊस-कवितांत यावेळी श्रोते चिंब झाले. कवयित्री किरण के.,मुक्तविहारी, कृष्णा कांबळे, देविदास चौधरी, नाना महाजन, मंदोदरी पाटील, राजेंद्र दिघे, काशीनाथ गवळी, अमोल खरे, शाहीर अर्जुन साळवे, सुरेश नारायणे, दत्ता वालेकर, सुनील पवार, प्रतिभा खैरनार, धनराज दौंड आदींसह चाळीसहून अधिक कवींनी पाऊस-कविता सादर केल्या.

कवी संदीप देशपांडे यांनी या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. तर कवी जनार्दन देवरे, मनोज गांगुर्डे, प्रा. जे. वाय. इंगळे, सुषमा तिवारी, सीमा वानखेडे, रेखाताई येणारे, चंद्रकांत चौधरी यांनी या बरखा काव्योत्सवाचे संयोजन केले. युवा कवी शांताराम वाघ यांनी आभार मानले.

बऱ्याच वर्षानंतर शहरात झालेल्या या साहित्यिक कविता उत्सवामुळे साहित्य रसिकांना एक नवी सांस्कृतिक व साहित्यविषयक ऊर्जा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. सर्व उपस्थित कवींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या कविता-उत्सवात पुणे, परळी, पालघर, मालेगाव, नगर, नांदगाव व घाटनांदूर या महाराष्ट्रातील विविध भागांतून साहित्यिक सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...