आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोषण ट्रॅकर ॲप मराठीत:येवल्यात मागण्यांसाठी अंगणवाडीसेविकांचा ठिय्या

येवला8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडीसेविकांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोषण ट्रॅकर ॲप मराठीत द्यावे, अंगणवाडीसेविकांना कामकाजासाठी नव्याने मोबाईल द्यावे, मानधनात वाढ करावी, माहिती भरण्यासाठीचे पोषण अॅप अंगणवाडीसेविकांच्या शिक्षणाचा विचार करून मराठीमध्ये उपलब्ध करून देण्यात यावे, ३० एप्रिल २०१४ नंतर सेवा समाप्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना लाभाची रक्कम त्वरित द्यावी, अंगणवाडी केंद्रातील साहित्याची त्वरित दुरुस्ती करावी, ज्या अंगणवाडीसेविकांना अतिरिक्त अंगणवाडी केंद्राचे काम दिले आहे.

त्याचा मेहनताना दिला जावा, सेविका कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा विनाविलंब त्वरित भराव्यात, अंगणवाडीचे साहित्य केंद्रात पोहोच करण्यात यावे, मिनी अंगणवाडीसेविकांना अंगणवाडी केंद्र बांधून द्यावे सेविकांइतके मानधन उन्हाळी व दिवाळी रजा देण्यात याव्यात, तीन ते सहा वयोगटातील लाभार्थ्यांना आहार शिजवून देण्यासाठी गॅस शेगड्या व भांडी देण्यात यावीत, सेवा ज्येष्ठतेनुसार मानधन देण्यात यावे, इंधनाचे बिल तीन रुपये प्रति लाभार्थी प्रमाणे देण्यात यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

मागण्यांची दखल न घेतल्यास कामबंद आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. बृजपाल सिंह, राजेश सिंह, भगवान दवणे, तालुका संघटना प्रमुख जिजाबाई सोमनाथ जगझाप, बीटप्रमुख बेबी गाढे, आदींसह तालुक्यातील सेविकांनी आंदोलनात सहभाग घेतला. गटविकास अधिकारी अन्सार शेख यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात येऊन आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...