आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालेगावी पानसरे व नरेंद्र दाभोलकर खुनाचा शासनाला विचारला जाब:अंनिसची ‘नफरतो भारत छोडो’ प्रभातफेरी

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मालेगाव शाखेतर्फे शनिवारी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ व ‘नफरतो भारत छोडो’ अशी मूक घोषणा देत प्रभात फेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते राष्ट्रीय एकात्मता चौक पर्यंत निघालेल्या या मूक फेरीत कार्यकर्ते हातात नफरत छोडो व शहीद डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अमर रहे, या घोषणांचे फलक घेऊन व काळे कपडे घालून, काळ्या फिती लावून सहभागी झाले होते.

शहीद नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसे सामाजिक सप्ताहांतर्गत ही फेरी झाली. शनिवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर शहीद दिनानिमित्त शासनाला त्यांच्या खुनाचा जाब विचारण्यासाठी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ व ‘नफरतो भारत छोडो’ ही मूक प्रभातफेरी झाली. यात मामकाे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, सुभाष परदेशी, अजय शहा, उमेश अस्मर, विलास वडगे, प्रवीण वाणी, सुरेंद्र टिपरे, नाना महाजन, स्वाती वाणी, डॉ. कल्पना भावसार, अहिरे, डॉ. संदीप खैरनार, रहम शेख, दिलीप वडगे, नचिकेत कोळंबकर, नसीम अहमद, केशव भोई, सोमनाथ वडगे, राजू पवार, दत्तू चौधरी, सारंग हिरे, आशाताई भावसार, अॅड. सुचिता सोनवणे, आनंद आढाव, जयंत यशोद, श्याम शिंपी आदींसह अंनिसचा व आम्ही भारताचे लोक या दोन्ही संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...