आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:युपीएससी उत्तीर्ण अपूर्व अस्मर हे मामकोचे भूषण; मालेगाव येथील सत्कार सोहळ्यात मामको बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांचे उद्गार

मालेगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परिश्रमपूर्वक यूपीएससी परीक्षेत यश प्राप्त करणारा अपूर्व हा मामको परिवाराचे भूषण आहे, असे उद्गार मामको बँकेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले यांनी काढले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ५५८ क्रमांक मिळवून उत्तीर्ण झालेल्या अपूर्व अस्मर यांचा सत्कार करताना ते बोलत होते.

भोसले म्हणाले, अपूर्व हा मामको बँकेचे संस्थापक वैकुंठवासी हरिलालदादा अस्मर यांचा नातू असल्याने तो मामको परिवाराचाच सदस्य आहे. याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान असून त्याचे विशेष कौतुक आहे. त्याच्या यशामध्ये अस्मर कुटुंबियांचे प्रोत्साहन आणि त्याच्यावरचे संस्कार या जोरावर त्याने कठोर परिश्रमपूर्वक हे यश मिळवल्याचे भोसले यांनी सांगितले. याप्रसंगी बँकेचे ज्येष्ठ संचालक सतीश कलंत्री, अॅड. भरत पोफळे यांनीही आपल्या भाषणातून अपूर्वचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना अपूर्व भावृक झाला होता.

थोडक्यात बोलताना त्याने बँकेने केलेल्या सत्काराविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्याचे वडील धनंजय अस्मर व शिक्षिका असलेल्या आई शुभांगी अस्मर यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. या सत्कार सोहळ्यासाठी अपूर्वचे आजोबा पंढरीनाथशेठ अस्मर, आजी नलिनी अस्मर, उपाध्यक्ष गौतम शाह, संचालक दादाजी वाघ, भिका कोतकर, संचालिका मंगला भावसार, व्यवस्थापक मंडळाचे संचालक रवींद्र ओस्तवाल, बँकेचे जनरल मॅनेजर कैलास जगताप तसेच विजय भावसार, अशोक व्याळीज यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...