आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज प्रक्रिया:जेईई मेनच्या दुसऱ्या सत्रासाठी‎ ७ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन इन्‍स्‍टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी‎ (आयआयटी), एनआयटी या नामांकित‎ संस्थांमध्ये प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग‎ एजन्सीतर्फे २४ जानेवारी ते १ फेब्रुवारी या‎ दरम्यान जेईई मेन परीक्षेचा पहिला टप्पा‎ घेण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या सत्रातील‎ परीक्षेसाठी येत्या मंगळवारपासून (दि. ७‎ फेब्रुवारी) अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.‎ ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सत्रात परीक्षेला‎ प्रविष्ट होता आले नाही, त्यांच्यासाठी दुसऱ्या‎ सत्रातील परीक्षेची संधी असेल.

७ मार्चपर्यंत‎ विद्यार्थी अर्ज करू शकतील.‎ दुसऱ्या टप्प्यातील परीक्षा एप्रिल महिन्यात‎ घेतली जाणार आहेत. बी. ई., बी. टेक, बी.‎ आर्क व बी. प्लॅनिंग या अभ्यासक्रमांसाठी‎ जेईई मेन २०२३ या परीक्षेच्या दोन संधी आहे.‎ दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी ७ फेब्रुवारी ते ७‎ मार्च या कालावधीत अर्ज करता येईल. २ ते‎ १२ एप्रिल या दरम्यान दुसऱ्या सत्राची परीक्षा‎ होईल.‎

बातम्या आणखी आहेत...