आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इच्छूक स्वयंसेवक व स्वयंसेविका:विभागीय क्षेत्ररक्षक या मानसेवी पदासाठी करा अर्ज

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागरी संरक्षण कार्यालयाच्या अधिपत्याखालील अंबड, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, भद्रकाली, सरकारवाडा, देवळाली कॅम्प, ओझर या आठ नागरी संरक्षण विभागात विभागीय क्षेत्ररक्षक हे मानसेवी पद भरावायचे आहे. इच्छूक स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी टपालाद्वारे किंवा व्यक्तिश: बंद पाकिटात जिल्हाधिकारी कार्यालयातील उपनियंत्रक नागरी संरक्षण कार्यालयात ३० डिसेंबर,२०२२ सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करावेत, असे नागरी संरक्षण कार्यालय, नाशिकचे उपनियंत्रकांनी कळविले आहे.

सदरचे पद हे मानसेवी असून या पदास शासनाकडून कोणत्याही प्रकारचे वेतन, प्रोत्साहन, भत्ता, मानधन इत्यादी सवलती देण्यात येणार नाही, अधिक माहितीसाठी सहायक उपनियंत्रक, नागरी संरक्षण कार्यालय,नाशिक यांच्याशी ०२५३-२५७३१४९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...