आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:ग्रामीण भागातील अश्विनीची विक्रीकर निरीक्षकपदी नियुक्ती

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनाचा ठाम निश्चय असला की कुठल्याही परिस्थितीत यश मिळतेच. अभ्यासाचे सातत्य व चिकाटीने येथून जवळच असलेल्या मेसनखेडे (शिंगवे) ता. चांदवड येथील अश्विनी कृष्णराज शेवलेकर हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भरारी घेत विक्रीकर निरीक्षकपदाला गवसणी घातली.

अश्विनी शिंगवे येथील प्रा. कृष्णराज गंगाधर शेवलेकर यांची कन्या व निमगाव ता. सिन्नर येथील मयूर सखाहारी मानेकर यांच्या पत्नी आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शिंगवे येथे झाले.

पदवी शिक्षण मनमाड येथील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात झाले. त्यानंतर डी.एडचे शिक्षण पूर्ण केले. विवाह झाल्यानंतरही अभ्यासाची चिकाटी सोडली नाही आणि स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचा निर्धार केला. पहिल्याच प्रयत्नात पोलिस उपनिरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झाली पण ध्येय वेगळेच होते. म्हणून पुन्हा जोरदार तयारी करून विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. या प्रवासात युनिक अकॅडमी पुणे, शिक्षक, आई, वडील, पती, सासू-सासरे यांची मोलाची साथ व मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे सर्वस्तरातून काैतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...