आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्याचा गौरव:उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान ; येवला तहसील कार्यालयात महसूल दिन

येवला9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महसूल दिनानिमित्त येवला- नांदगाव उपविभागाचा विशेष कार्यक्रम तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी ज्योती कावरे होत्या. याप्रसंगी दरवर्षी दिलेल्या उद्दिष्टाची पूर्तता करणा-या महसूल यंत्रणेतील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. प्रारंभी प्रांताधिकारी कावरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. काळाप्रमाणे स्वत:मध्ये बदल घडवा. सध्याचे युग हे ऑनलाईन युग असुन ई-चावडी, ई-पीकपाहणी, ई-ऑफीस, ई-गव्हर्नन्स अशा विविध ऑनलाईन संकल्पना राबविण्या करिता तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे प्रतिपादन कावरे यांनी केले.तहसीलदार प्रमोद हिले यांनी मनोगत व्यक्त केले.

उपविभागात उत्कृष्ट काम करणारे येवला प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून सोमनाथ शिंदे, महसूल सहाय्यक पवनकुमार जारवाल, रविकुमार किनाके, येवला तहसील कार्यालयातील अव्वल कारकून बाळासाहेब हावळे, महसूल सहाय्यक चेतन चंदावार, योगेश मिटकरी, तृप्ती बोरसे, तलाठी ज्ञानेश्वर रोहकले, अश्विनी भोसले, शिपाई सुधीर पाटसकर, कोतवाल लक्ष्मण आहेर, तसेच नांदगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून अश्विनी पैठणे, मंडळ अधिकारी गोविंद काळे, महसूल सहायक धनराज बच्छाव, खंडेराव शिंदे, तलाठी तुषार येवले, प्रतिभा नागलवाड, शिपाई अरुण सोनवणे, कोतवाल प्रकाश पवार, तसेच येवला भूमिअभिलेख कार्यालातील परिरक्षण भूमापक प्रशांत शेलार, भुकरमापक सोमनाथ सानप या कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आलेला आहे.

सूत्रसंचलन शिवाजी भालेराव व आभार प्रदर्शन नायब तहसीलदार विवेक चांदवडकर यांनी केले. कार्यक्रमास नांदगांव तहसीलदार सिध्दार्थ मोरे, येवला शहर पोलीस निरीक्षक भगवान मधुरे, ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल भवारी, स्वीय सहायक बाळासाहेब लोखंडे, बाळासाहेब कापसे, गटविकास अधिकारी अन्सार शेख, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, उपअधिक्षक भूमी अभिलेख संजय राजपुत, दुय्यम निबंधक भागवत गायकवाड, नायब तहसीलदार श्रीमती हिरे, श्रीमती मगर, श्रीमती पराते आदीसह महसुल कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...