आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:राज्य सरकारची केंद्रप्रमुख पदोन्नती निर्णयाला मान्यता

सायखेडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शिक्षण विभागातील केंद्रप्रमुख पदाच्या असंख्य जागा रिक्त आहे. या जागेवर ५०% पदोन्नती आणि ५०% जागा प्राथमिक शिक्षकांची स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्यात याव्या, अशी प्राथमिक शिक्षक संघटनेची अनेक वर्षांची मागणी हाेती. तिला अखेर यश आले आहे. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या बाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला असल्याची माहिती संघांचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी दिली.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या १८ मार्च रोजी झालेल्या पनवेल येथील अधिवेशनात तत्कालीन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी या निर्णयाची घोषणा केली होती. मात्र ताे निर्णय अनेक वर्ष लालफितीत प्रलंबित राहिला होता. विद्यमान शिक्षणमंत्री केसरकर यांनी तत्काळ मंजुरी देऊन प्रश्न निकाली काढला आहे. राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने २०१४ पासून महाराष्ट्रातील असंख्य रिक्त जागा या ५० टक्के पदोन्नतीने व ५० टक्के प्राथमिक शिक्षकातून विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्यासाठी शासनस्तरावर सतत पाठपुरावा केला.

यामुळे १ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाने केंद्रप्रमुखांची पदे ही प्राथमिक शिक्षकांमधूनच भरण्यात यावी, असे सुचित करून ५० टक्के पदोन्नती व ५० टक्के विभागीय स्पर्धा परीक्षा घेऊन पदे ज्या ज्या प्रमाणे रिक्त होतील, त्या त्या प्रमाणात ती भरली जाणार आहेत. पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या हक्कासाठी लढणारी राज्य प्राथमिक शिक्षक संघटना असून संघटनेच्या लढ्याला फार मोठे यश यामुळे प्राप्त झाले आहे, असे राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अंबादास वाजे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...