आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भूमीअभिलेखची मनमानी; युवक रिपाइंचे आंदोलन

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भूमीअभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात मंगळवारी (दि. १) रिपाइं युवक आघाडीच्या वतीने कार्यालयाला हार घालून ‘टाळा ठोको’ आंदोलन करण्यात आले.रिपाइं युवक तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे, रिपाइं शहर सचिव अॅड. प्रमोद आहिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यालयाला टाळा ठोकत चपलांचा हार घालून निषेध करण्यात आला. येथे कार्यरत असलेले अधिकारी हे कायम मोजणीला गेले आहे, मिटिंगला आहेत असे सांगून कार्यालय बंद ठेवले जाते. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांची प्रलंबित असलेली कामे अद्यापही तशीच आहेत.

त्यामुळे जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याविरोधात हे आंदोलन केले असल्याचे निकाळे यांनी सांगितले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन कारवाई करावी, अन्यथा याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा निकाळे यांनी दिला आहे. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक प्रभाग क्रमांक ४ विभागातील शासकीय जागेवरील निवासी अतिक्रमणे कायम करून भोगवाटादार वर्ग दोनचे उतारे मिळण्यासाठी गेल्या ६ ते ८ महिन्यांपासून मोजणी पूर्ण न केल्यामुळे संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांशी संपर्क होत नाही. शहरातील अनेक प्रकरणे प्रलंबित असून नागरिक त्रस्त असून भूमीअभिलेख कार्यालय प्रशासनाविरोधात निषेध नोंदविण्यात आला. यावेळी योगेश पगारे, विकास शिंदे, चंद्रमणी उबाळे, सागर केदारे आदींसह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...