आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिलासा:‘आरोग्यवर्धिनी’तून आदिवासींना 13 प्रकारच्या आरोग्य सेवा,ग्रामीण आरोग्य सेवा सक्षम होण्यास मदत; कळवण तालुक्यातील 35 गावांत केंद्र, आदिवासी बांधवांत समाधान

कळवण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, आयुष्यमान भारत उपक्रमांतर्गत तालुक्यात ३५ ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गावागावातील आरोग्य उपकेंद्रात सुरू झालेल्या या आरोग्यवर्धिनी केंद्रात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना २४ तास या सेवेचा लाभ मिळणार आहे. या केंद्रात नागरिकांना १३ प्रकारच्या आरोग्य सेवा उपलब्ध होत आहेत.

कळवण सारख्या आदिवासीबहुल भागात खेडोपाडी सर्व सोयीसुविधांयुक्त आरोग्य सेवा नाही. त्यामुळे स्थानिकांना छोट्या मोठ्या उपचारांसाठी शहर गाठावे लागते. किंवा शहराचा पर्याय टाळला तर रुग्णांना बोगस डॉक्टरांच्या लुटेला सामोरे जावे लागते. आजार बळावतात व रोगापेक्षा उपाय भयंकर याचा प्रत्यय गरीब आदिवासी बांधवांना येतो. हिच बाब हेरून शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गावागावात असलेल्या आरोग्य उपकेंद्रात आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केले. यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.

त्यांच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. तालुक्यातील ३५ ठिकाणच्या आरोग्यवर्धिनी केंद्रात प्रशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा निश्चितच सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

बातम्या आणखी आहेत...