आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविखरणी फेस्टिव्हल आणि लक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. होम मिनिस्टर मानाची पैठणी ज्योती दीपक कदम यांनी तर द्वितीय पैठणी मनीषा कदम यांनी जिंकली. मोनाली गायके लकी ड्रा विजेत्या ठरल्या. कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक डॉ. मोहन शेलार, उपाध्यक्ष ज्योती शेलार मुख्याध्यापिका वनिता गायकवाड यांनी केले होते. प्रमुख अतिथी म्हणून मजूर फेडरेशन संचालक सविता धनवटे, सरपंच मीनाताई पगार, उपसरपंच राधाताई पवार, श्रावण वाघमोडे, अंकुश बोराडे, संतोष दौडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिवजन्मोत्सव ते शिवराज्याभिषेक सोहळा वर्णन पर नृत्याने झाली. कार्यक्रमात सर्व बालगोपालांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. विविध प्रकारची नृत्ये, प्रसंग वर्णनपर नृत्ये सादर केली. सूत्रसंचालन इयत्ता आठवीचे विद्यार्थी सार्थक भाऊराव सोनवणे व वृशाली गोविंद शेलार यांनी केले. शालेय स्पर्धा व आंतरराष्ट्रीय गणित परीक्षा, आयएमआे परीक्षेत नैपुण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी मनिषा तक्ते, अश्विनी सोनवणे, रोहिणी जाधव, सायली भालेराव, स्वाती जाधव, कोमल सांळुंखे, अश्विनी ठाकरे, ज्ञानेश्वर तळेकर, दीपक घुमरे, सुनील खुरसने, उषा सोनवणे यांनी प्रयत्न केले. अश्विनी सोनवणे यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.