आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासरस्वती बालक मंदिर, सरस्वती विद्यामंदिर व निर्मला माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने निर्मला सरस्वती सांस्कृतिक उत्सव सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे, महाभारत फेम गजेंद्र चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विविध सांस्कृतिक उत्सवात नृत्यप्रकारात ६७१ विद्यार्थ्यांनी कलाविष्कारांचे प्रदर्शन केले. याप्रसंगी प्रसिद्ध सिनेअभिनेत्रे अभिनेते विनय आपटे यांच्या पत्नी वैजयंती आपटे, शीतल झांबरे उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक होळकर होते. गजेंद्र चौहान यांनी महाभारतातील संवाद सादर करत सांस्कृतिक उत्सवाचे भरभरून कौतुक केले. लासलगाव विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून देत शाळेच्या प्रगतीचा आढावा व विद्यार्थ्यांमधील विविध कलागुण अविष्कार याविषयी आपले मत मांडले. या कार्यक्रमासाठी लासलगाव चे सरपंच जयदत्त होळकर वैकुंठराव होळकर, वैशाली होळकर, संगीता होळकर, प्रतिभा होळकर, रेवती होळकर, योगिता पाटील, सचिव गुणवंत होळकर, संचालक बाळासाहेब बोरसे, डॉ. विकास चांदर, संदीप होळकर, दिलीप पटेल, अरविंद होळकर आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक भीमराव शिंदे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढाव मांडला व मागील वर्षांचा मागोवा घेतला. रूपाली शिंदे, प्रदीप ठाकरे, श्रेया जोशी, यशोधन होळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.