आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गून्हेवृत्त:रागाने बघतो म्हणून तरुणाच्या हाताचा पंजाच छाटला; मालेगाव येथील घटना, संशयित हल्लेखोर फरार

मालेगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेहमी रागाने बघतो म्हणून थेट तरुणाच्या हाताचा पंजाच छाटल्याचा प्रकार महेवीनगर भागात सोमवारी सायंकाळी घडला. फैजूल रहेमान शेख (२२) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर इब्राहिम हा फरार झाला असून पवारवाडी पोलिस त्याचा शोध घेत आहे.

महेवीनगरमध्ये राहणारा फैजूल रहेमान हा घरासमोर दुचाकी धुवत होता. यावेळी संशयित इब्राहिम हा त्याच्याजवळ आला. तू माझ्याकडे नेहमी रागाने का बघतोस अशी विचारणा करत वाद घातला. शिवीगाळ करत दमबाजी केली. फैजूल याने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, इब्राहिम याने त्याच्या हातातील धारदार शस्त्र काढून फैजूलवर हल्ला केला. यात फैजूलच्या उजव्या हातावर जोरदार वार झाल्याने त्याच्या हाताचा पंजा मनगटापासून पूर्णपणे वेगळा झाला. हल्ला करून इब्राहिम घटनास्थळावरून पसार झाला. फैजूलला त्याचा भाऊ फईम याने जखमी अवस्थेत एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिस निरीक्षक वसंत भोये यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली.

बातम्या आणखी आहेत...