आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प. मुख्य कार्यकारी‎ अधिकाऱ्यांचे आश्वासन‎:आशासेविका, गटप्रवर्तकांच्या थकीत‎ मानधनप्रश्नी ग्रामपंचायतींना पत्र देणार‎

मालेगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात आरोग्यसेवा‎ दिलेल्या आशासेविका व‎ गटप्रवर्तक यांचे थकीत मानधन‎ एकाच वेळी देण्यात यावे, यासाठी‎ ग्रामपंचायतींना पत्र देण्यात येईल,‎ असे आश्वासन जि. प. मुख्य‎ कार्यकारी अधिकारी आशिमा‎ मित्तल यांनी कर्मचारी युनियनच्या‎ शिष्टमंडळाला दिले.‎ कोरोनाकाळात आरोग्यसेवा‎ दिलेल्या आशासवेविका व‎ गटप्रवर्तकांना ग्रामपंचायत‎ पातळीवरून प्रति महिना एक हजार‎ रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा‎ असे आदेश राज्य शासनाने काढले‎ होते. मात्र तालुक्यातील‎ आशासेविका व गटप्रवर्तकांना‎ फक्त एकाच महिन्याचे मानधन‎ मिळाले आहे. याकडे लक्ष‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ वेधण्यासाठी सीटू संलग्न नाशिक‎ जिल्हा आशा व गटप्रवर्तक‎ कर्मचारी युनियनने प्रजासत्ताक‎ दिनाच्या पूर्वसंध्येला येथील‎ पंचायत समिती आवारात बिऱ्हाड‎ आंदोलन केले होते. प्रजासत्ताक‎ दिनाच्या ध्वजारोहणानंतर‎ गटविकास अधिकाऱ्यांनी‎ आंदोलकांचा विषय जि. प. मुख्य‎ कार्यकारी अधिकारी यांच्यापर्यंत‎ नेऊन बैठकीत चर्चा करण्याचे‎ आश्वासन दिले होते.

या‎ पार्श्वभूमीवर युनियनच्या‎ शिष्टमंडळाने जि. प. मुख्य‎ कार्यकारी अधिकारी आशिमा‎ मित्तल यांची भेट घेतली. त्यांनी‎ शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा‎ केली. तसेच आशा, गटप्रवर्तक‎ यांच्या कोरोना प्रोत्साहन‎ भत्त्याविषयी दुरुस्तीपत्र काढून सदर‎ निर्णय ग्रामपंचायत स्तरावर एकाच‎ वेळी घेण्यात यावा, असे पत्र दोन‎ दिवसांत काढण्यात येईल असे‎ आश्वासन दिले.‎ यावेळी सीटू संलग्न नाशिक‎ जिल्हा आशा व गटप्रवर्तक‎ कर्मचारी युनियनचे नेते डॉ. डी.‎ एल. कराड, विजय दराडे, कल्पना‎ शिंदे, चित्रा सोनवणे, शशिकला‎ बच्छाव, मोहिनी मैंद, वृक्षाली‎ बोरगुडे, रत्ना केदारे, मंगल शिंदे‎ आदी उपस्थित होते.‎

तर जि.प.समोर बिऱ्हाड‎ आंदोलन‎ आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे‎ दोन वर्षाचे अर्थात प्रत्येकी एकूण‎ २४ हजार रुपये इतके मानधन‎ थकले आहे. जिल्हा‎ प्रशासनाकडून आशा व‎ गटप्रवर्तकांच्या थकीत मानधन‎ संदर्भात पत्र न निघाल्याने दि.१३‎ फेब्रुवारी पासून जिल्हा परिषद‎ समोर बिऱ्हाड आंदोलन करण्यात‎ येईल असा इशारा युनियनने दिला‎ आहे.‎

बातम्या आणखी आहेत...