आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाविकांची गर्दी होण्याची शक्यता:दोन वर्षांनंतर आज भरणार आश्विनाथ महाराज यात्रा

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या तालुक्यातील घोटेवाडी येथील आश्विनाथ तथा आशापीर बाबा देवस्थानचा यात्रोत्सव गुरुवारी (दि. १८) होत आहे. दोन वर्षांपासून कोरोनामुळे यात्रोत्सव बंद होता. यंदा दोन वर्षांनंतर यात्रा भरणार असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. संगमनेर तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांसाठी वावी तसेच निमोण येथून बससेवा उपलब्ध करण्यात आली आहे. यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन घोटेवाडीच्या सरपंच मंजूश्री भरत घोटेकर, उपसरपंच रंजना चंद्रभान घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान घोटेकर, सोसायटीचे अध्यक्ष सुकदेव वैराळ यांच्यासह यात्रा कमिटीने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...