आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाथरे येथील साई लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कर्जदारांकडून वसुलीसाठी कलम १०१ चे प्रमाणपत्र देण्याकरिता येथील सहायक निबंधक एकनाथ प्रताप पाटील (५७) यांनी प्रति एक हजार ५०० रुपये प्रमाणे १७ कर्जदारांचे एकूण २५ हजार५०० रुपयांची मागणी पतसंस्थेच्यावसुली कर्मचाऱ्याकडे केली होती.
गुरुवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास१५ हजार ५०० रुपये स्वीकारतानापाटील यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यातआले. दरम्यान खरेदी विक्री संघाचे निवडणूक अधिकारी म्हणून पाटील काम पाहत होते. उमेदवार माघारीचा दिवस असल्याने यावेळी गर्दी होती. या गर्दीतच ही कारवाई करण्यात आली. पाटील यांनी प्रत्येक प्रस्तावाचे २ हजार याप्रमाणे ३४ हजार रुपये मागितले होते.
अखेर २५ हजार ५०० रुपये देण्याचे ठरले. २६ फेब्रुवारीला १० हजार रुपये पाटील यांना देण्यात आले. दाखले तयार झाल्यानंतर उर्वरित रकमेशिवाय दाखल्यांवर स्वाक्षरी करण्यास नकार दिला. अखेर पतसंस्थेच्या सेवकाने बुधवार दि. १ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दिली होती. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानंतर सेवकाने पुन्हा पाटील यांची भेट घेऊन उर्वरित १५,५०० रुपये देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार गुरुवार दि. २ रोजी दुपारी सव्वा वाजता १५ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पाटील यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पथकाने दिली.
पाटील यांच्यासह त्यांच्या टेबल व बॅगची झडती घेण्यात आली. पाटील यांच्यासह तक्रारदाराचे जबाब घेण्यात आले. उपविभागीय अधिकारी अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक संदीप साळुंखे, हवालदार सुखदेव मुरकुटे, पंकज पळशीकर, मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.