आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायरन वाजताच चोरटे पसार:मालेगावी एटीएम फोडण्याचा प्रयत्न

मालेगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅक्सिस बँकेच्या मुंबईस्थित युनिटची सतर्कता व कॅम्प पोलिसांच्या तत्परतेने चोरट्यांचा सटाणानाका भागातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला. पोलिस वाहनाच्या सायरनचा आवाज ऐकून चोरटे साहित्य सोडून पसार झाले. हा प्रकार शनिवारी पहाटे साडेचार वाजता घडला. सटाणानाक्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. पहाटे दोन संशयित एटीएममध्ये घुसले. आतील सीसीटीव्ही कॅमेरे प्लॅस्टिक पिशवीने झाकत असल्याचा प्रकार मुंबईच्या फुटेज स्ट्राँग-रूम कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला.

या परिसराचे लोकेशन सटाणा नाका मिळाल्याने स्ट्राँगरूमद्वारे सटाणा पोलिसांशी संपर्क साधला गेला. मात्र, हे एटीएम मालेगावात असल्याचे लक्षात येताच सटाणा पोलिसांनी कॅम्प पोलिसांना कल्पना दिली. गस्तीवर असलेले कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रकाश काळे कर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा सुगावा लागताच चोरटे पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...