आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाळण्याचा प्रयत्न:शेतीच्या वादातून एकाला जाळण्याचा प्रयत्न; न्यायालयाने दोघांना 9 मेपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

येवला14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुसूर येथे जमिनीच्या बांधाच्या वादातून एका शेतकऱ्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यात शेतकरी ४० टक्के भाजला असून त्यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. याबाबत दिलीप शेषराव गायकवाड (५५) यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी १३ संशयितांवर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने दोघांना ९ मेपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या शेतातील जमिनीचा बांध फोडून ३० ते ४० फूट जमीन संशयितांनी नांगरली होती. याबाबत ते संशयितांना समजावून सांगण्यासाठी गेले असता संशयितांनी गायकवाड यांचे म्हणणे न एेकता त्यांच्यावर दादागिरी केली. त्याचवेळी संग्राम मेंगाळ व राहुल हिंगे यांनी पाण्याच्या बाटलीतून डिझेल आणून गायकवाड यांच्या अंगावर ओतले

तर मेंगाळ यांनी काडी पेटवून गायकवाड यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संग्राम मेंगाळ, राहुल हिंगे, मोनाली हिंगे, दीपक हिंगे, नीलेश हिंगे, रामदास मेंगाळ, सुमनबाई मेंगाळ, भागिनाथ हिंगे, किरण हिंगे, नवनाथ मेंगाळ, मथुराबाई हिंगे, दिलीप हिंगे, सर्जेराव हिंगे, रवींद्र नवले या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संग्राम मेंगळ व राहुल हिंगे यांना अटक केली आहे. सहायक निरीक्षक एकनाथ भिसे याप्रकरणी तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...