आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दस्ता नायक शिबिर:समाजात दुही निर्माण करण्याचे प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही; जिल्हास्तरीय पाच दिवसीय शिबिराचा येवल्यात समारोप

येवला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील काही लोकांनी भोंग्यांसारखे बिनकामाचे विषय उपस्थित करून समाजामध्ये अनर्थ व दुही निर्माण करण्याचे प्रयत्न चालविले आहे, ते पुरोगामी महाराष्ट्रातील बहुजन समाज हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, त्यात राष्ट्र सेवादलासारखी परिवर्तनवादी संघटना मागे राहणार नाही, असे उद्गार राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य यांनी काढले.

जिल्हा राष्ट्र सेवादलाच्या वतीने आयोजित पाच दिवसीय दस्ता नायक शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्र सेवादलाचे कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे होते. वैद्य यांनी समाजाचे दैनंदिन जगण्याचे प्रश्न राष्ट्र सेवादलाचे कार्यकर्ते उत्तमरितीने जाणून आहेत. सेवादलाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक प्रकारची सामाजिक बांधिलकी मानून काम करणारी दुसरी कोणतीही संघटना नसल्यामुळे राष्ट्र सेवादलाला आपले भविष्य उज्ज्वल वाटते, असे सांगितले.

पाच दिवस चाललेल्या या शिबिरात जिल्ह्यातील सुमारे १०० सैनिक सहभागी झाले होते. शाखा तंत्र, चळवळीतील गाणी, अॅरोबिक्स, लेझीम, झांज, पथनाट्य आदींच्या माध्यमातून कार्यकर्ता तयार करण्याची ही कार्यशाळा यशस्वी झाल्याचे गौरवद्गार वैद्य यांनी काढले. शिबिरार्थीपैकी मयूर जाधव, ऋतुजा घोटेकर, अदिती सोनवणे, इकरा शहा, सार्थक कोकाटे, प्रतीक्षा देवरे, नीलेश आहिरे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिबिरात राष्ट्र सेवादलाचे ज्येष्ठ प्रशिक्षक सदाभाऊ मगदूम, शाहिस्ता मुल्ला, राज कांबळे, मिलिंद कांबळे यांनी उत्कृष्ट जबाबदारी निभावली. यावेळी अल्पसंख्याक असलेल्या शाहिस्ता मुल्ला आणि मिलिंद कांबळे या दोन प्रशिक्षकांनी आयुष्यामध्ये आलेल्या दाहक अनुभवांचे कथन केले. इंडियन आयडाॅल आम्रपाली पगारे हिचा राष्ट्र सेवादलाची दिनदर्शिका देऊन सत्कार करण्यात आला.

शिबीर समारोपप्रसंगी प्रा. प्रमोद वागदरीकर, अरुण जोशी, प्राचार्य डॉ भाऊसाहेब गमे, प्रा.डॉ. अजय विभांडिक, प्रा. रंजना गाडे, प्रा.प्रतीक्षा गाडे, बजरंग संगमनेरकर, डॉ. महेंद्र नाकील, राजेंद्र लोंढे, प्रकल्प पाटील, राजेंद्र शेलार, नचिकेत कोळपकर, अझहर शाह, शकील शहा, अक्षय गाडे, सौ. नाकिल, संदीप शेजवळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा राज्य सेवादलाचे कार्याध्यक्ष दिनकर दाणे यांनी केले. शिबिर संयोजक म्हणून राजेंद्र बारे, शरद शेजवळ, उत्तम बंड, राजेंद्र जाधव, शिवाजी साताळकर यांनी जबाबदारी पार पाडली. या पाच दिवसीय शिबिरात वक्ते म्हणून अॅड. अंजली उगावकर, संदीप भावसार, डॉ. सुनीता राऊत,प्रा. अर्जुन कोकाटे, दिनकर दाणे, रामनाम पाटील, हिरामण पगार, बाबासाहेब कोकाटे, सुखदेव आहेर, गणेश जाधव, पंडित मढवई, आप्पासाहेब शिंदे आदींनी यशस्वीरित्या पार पाडली.

बातम्या आणखी आहेत...