आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावात घसरण:मनमाडला कांद्याला सरासरी 2500 रुपये भाव

मनमाडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक व भाव स्थिर होते. मक्याच्या भावात घसरण दिसून आली. तर धान्य व कडधान्याचे भाव तेजीत होते. गुरुवारी बाजार आवारात उन्हाळ कांद्याची २३८ ट्रॅक्टर इतकी आवक होऊन प्रथम दर्जाच्या कांद्याला १६०० ते २८४१ सरासरी २५०० रुपये क्विंटल तर दुसऱ्या दर्जाच्या कांद्याला ११०० ते २३०० सरासरी २००० रूपये क्विंटल असा भाव होता.

धान्य आणि कडधान्यात सरासरी मूग ७४५०, बाजरी १९८५, चना ४५०० रुपये, गहू २४४१, सोयाबीन ५१६१ रुपये क्विंटल असे भाव होते. मक्याची २०० नग इतकी आवक झाली. १६५५ ते २०७५ तर १९५१ रुपये क्विंटल असे भाव होते.

बातम्या आणखी आहेत...