आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदान:देवळ्यात १३ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८६.०९ टक्के मतदान

देवळा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. ४) सरासरी ८६.०९ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान सुभाषनगर ९८.९५ तर सर्वात कमी मतदान वाखारी येथे ८१.०२ टक्के झाले. १३ ग्रामपंचायतीच्या ८२ जागांसाठीच्या १७१ उमेदवार रिंगणात हाेते. शुक्रवारी सकाळी १० वाजता नवीन प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीत मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.

तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींसाठी सकाळी साडेसात वाजता मतदानास प्रारंभ झाला. सुरुवातीपासून मतदानाचा उत्साह दिसून आला. दुपारी काही वेळ मतदान केंद्रांवर शांतता असली तरी पुन्हा साडेतीननंतर मतदानप्रक्रियेस गती आल्याचे दिसून आले.

ग्रामपंचायतनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी पिंपळगाव (८३.२६), खुंटेवाडी (८२.०८), सावकी (८८.१३), गुंजाळनगर (८८.८७), वाखारी (८१.०२), खर्डे (८४.८३), खडकतळे (९०.६५), शेरी (८८.२२), वार्शी (८७.०६), विजयनगर (९०.८८), सुभाषनगर (९८.९५), कापशी (८९.९७), रामेश्वर (८३.३८).

बातम्या आणखी आहेत...