आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराेप:आझादनगर पाेलिस ठाण्याच्या गणरायाला निराेप

मालेगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आझादनगर पाेलिस ठाण्यात प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे मंगळवारी दुपारी विधिवत विसर्जन करण्यात आले. पाेलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हस्ते आरती करून बाप्पाची सजविलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात काढली. कर्मचाऱ्यांनी वाद्याच्या तालावर थिरकत गणपती बाप्पाचा जयघाेष केला. महादेव घाट येथील कुंडात मूर्तीचे विसर्जन झाले.

पाेलिस अधीक्षक पाटील, अपर पाेलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व उपस्थित सर्व पाेलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांचे भगवे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. मिरवणुकीत पाेलिस उपअधीक्षक प्रदीप जाधव, आझादनगरचे पाेलिस निरीक्षक अशाेक रत्नपारखी, आयेशानगरचे निरीक्षक विकास देवरे, पवारवाडीचे सहायक निरीक्षक डी. जे. बडगुजर, शांतता समितीचे सदस्य केवळ हिरे यांच्यासह पाेलिस कर्मचारी सहभागी झाले हाेते.

बातम्या आणखी आहेत...