आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासप्टेंबर महिन्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने शहरातून जाणाऱ्या सरस्वती नदीला आलेल्या महापुरात येथील पडकी वेस भागातील वाहून गेलेल्या फरशी पुलाचे काम अर्धवट झाले आहे. रात्रीच्यावेळी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या परिसरात छोटे मोठे अपघाताची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने सरस्वती नदीला महापूर आला होता. यात शेकडो घरांसह पडकी वेस येथील पूलही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. पुलाखालील सिमेंटचे पाईपच वाहून गेल्याने रस्त्याने ये - जा करणे बंद झाले होते. यानंतर माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी स्वखर्चाने येथे लोखंडी पूल बसवून परिसरातील नागरिकांना दिलासा दिला होता. मात्र पुन्हा झालेल्या अतिवृष्टीने हा पूलही वाहून गेला.
दिवाळीत नागरिकांसह गणेशपेठ भागातील व्यापाऱ्यांना हा रस्ता बंद झाल्याने तत्काळ पूल तयार करण्याची मागणी होती. मात्र नगरपरिषदेने तात्पुरते सिमेंटचे पाईप टाकत त्यावरून माती टाकली आहे. पुलाजवळील रस्त्याचा निम्मा भाग पाण्यात वाहून गेल्याने या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. रात्रीच्यावेळी हा खचलेला रस्ता दिसत नसल्याने या ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याचीही शक्यता आहे. अवजड वाहनामुळे उरलेला रस्ताही खचत असल्याने नगरपरिषदेने याकडे लक्ष देऊन या ठिकाणी पक्क्या व उंच पुलाची उभारणी करण्याची मागणी नागरिकांसह वाहनधारकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.