आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रास्ता रोको:दिंडाेरीत रस्त्यांची दुरवस्था, शिवसेनेचा रास्ता रोको

दिंडोरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेतर्फे आंदाेलन करण्यात आले.दिंडोरी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यांची झालेली चाळण, तालुक्यातील रस्त्यांवर पडलेले मोठमोठे खड्डे याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. पंधरा दिवसांत रस्ते खड्डेमुक्त झाले नाही तर प्रशासन व लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा माजी आमदार महाले यांनी सांगितले. तहसीलदार पंकज पवार यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले.

यावेळी सुरेश डोखळे, डॉ. विलास देशमुख, जयराम डोखळे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, नारायण राजगुरू, नीलेश शिंदे, अरुण गायकवाड, संगम देशमुख, सुनील मातेरे, अविनाश वाघ आदी उपस्थित होते. यावेळी पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अमोल पवार, पांडुरंग कावळे, राजेंद्र लहारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

बातम्या आणखी आहेत...