आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:बागलाणला 100 खाटांचे उपजिल्हा‎ रुग्णालय, शासनाचा हिरवा कंदिल‎‎

सटाणा, डांगसौंदाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कळवणच्या धर्तीवर‎ बागलाणसाठीही उपजिल्हा‎ रुग्णालय निर्माण करण्यास राज्य‎ शासनाकडून हिरवा कंदिल‎ मिळाला आहे. उपजिल्हा‎ रुग्णालयासाठीचा प्रस्ताव‎ उच्चस्तरीय समितीसमोर सादर‎ करण्यात आला असून लवकरच‎ त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल,‎ अशी माहिती आमदार दिलीप बोरसे‎ यांनी दिली आहे.‎ शहरातील आमदार कार्यालयात‎ बुधवारी (दि. १) आयोजित पत्रकार‎ परिषदेत बोरसे म्हणाले, सटाणा‎ शहरात ग्रामीण रुग्णालय‎ अस्तित्वात असून याठिकाणी‎ मिळणाऱ्या सोयीसुविधांना मर्यादा‎ येतात.

त्यामुळे तालुकावासीयांची‎‎‎‎‎‎‎‎ मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे‎ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला‎ शासनाच्या आरोग्य सुविधेचा‎ मोठ्या प्रमाणात लाभ मिळावा या‎ हेतूने सटाणा येथील ग्रामीण‎ रुग्णालयाऐवजी उपजिल्हा‎ रुग्णालय निर्मितीचा प्रस्ताव तयार‎ करण्यात आला आहे. यासाठी‎ शासन पातळीवर सातत्याने‎ पाठपुरावा करण्यात आल्याचे‎ आमदार बोरसे यांनी सांगितले.‎ सटाणा ग्रामीण रुग्णालयात‎ विक्रमी बाह्यरुग्ण तपासणी असून‎‎‎‎‎‎‎‎ तज्ञ डॉक्टर आणि शस्त्रक्रियेच्या‎ सुविधा नसल्याने तालुकावासीयांना‎ कळवण किंवा नाशिक येथील‎ रुग्णालयात जावे लागते. ग्रामीण‎ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल‎ होणाऱ्या गरीब महिलांना किचकट‎ शस्त्रक्रिया आणि प्रसूतीसाठी प्रसंगी‎ मालेगाव, धुळे किंवा नाशिकला‎ पाठवावे लागते. यासाठी सटाणा‎ येथेच उपजिल्हा रुग्णालय‎ कार्यान्वित व्हावे यासाठी पाठपुरावा‎ करण्यात येत होता, असेही आमदार‎ बोरसे यांनी सांगितले.‎

तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होतील‎
ग्रामीण रुग्णालयात केवळ ३० खाटा असून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर‎ झाल्यानंतर या ठिकाणी १०० खाटा उपलब्ध होतील.सोबतच बालरोगतज्ज्ञ,‎ स्त्रीरोगतज्ज्ञ तसेच सर्जन व अन्य तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध होतील.‎ शस्त्रक्रियांसाठीदेखील साधनसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध होईल.‎

बातम्या आणखी आहेत...