आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न:पालकमंत्री कार्यालयासमाेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यास जामीन मंजूर

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालकमंत्र्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या किशाेर नगराज कचवे ऊर्फ काकाजी या शेतकऱ्यास जामीन मंजूर झाला. रविवारी दुपारी कचवे यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. यानंतर पाेलिसांनी त्यांना ताब्यात घेतले हाेते.

बंदिस्त कालव्याच्या विराेधात आंदाेलन सुरू आहे. दखल घेतली जात नसल्याच्या नैराश्यातून दहिदी येथील शेतकरी काकाजी कचवे यांनी थेट पालकमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयाजवळ पाेहाेचून अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत स्वत:ला जाळून घेण्याचा प्रयत्न केला. पाेलिस कर्मचारी संदीप राठाेड यांच्या फिर्यादीवरुन कचवे यांच्याविराेधात छावणी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर मुक्तता करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...