आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादाेघा गाेरक्षकांचा अपघात नसून त्यांच्यावर नियाेजित हल्ला झाल्याचा गंभीर आराेप करत बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेने साेमवारी (दि.६) सकाळी निषेध माेर्चा काढला. शहर बंदचे आवाहन करत जाेरदार घाेषणाबाजी केली. घटनेची सखाेल चाैकशी करून मुख्य सुत्रधारासह हल्लेखाेरांवर कठाेर कारवाई करावी, अन्यथा आठ दिवसानंतर तीव्र आंदाेलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
रविवारी रात्री मुंगसे गावाजवळ गाेरक्षक मच्छिंद्र शिर्के व भरत सूर्यवंशी यांच्या दुचाकीला अपघात झाला. यात दाेघेही जखमी झाले आहेत. जनावरांची चाेरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना घडलेला अपघात नसून हल्ला असल्याचा आराेप बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला. या निषेधार्थ कार्यकर्ते अपर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र जमले हाेते. व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करत माेसमपूल, संगमेश्वर, माेतीबाग नाका, निसर्ग चाैक मार्गे पुन्हा माेसमपूलहून अपर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध माेर्चा काढला. येथे कार्यालयाच्या गेटबाहेर ठिय्या देत घाेषणाबाजी केली. गाेमातेचे व हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी बजरंग दल व विहिंप नेहमी तत्पर आहे. शहरात आठ महिन्यांत ६० कारवाया करून ३५० गाेवंश जनावरांना कत्तलीपासून वाचविले आहे.
हल्ला झाला म्हणून हे काम थांबणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे यासाठी आज शांततेच्या मार्गाने माेर्चा काढला आहे. पाेलिस प्रशासनाने हल्ल्यामागील सूत्रधारांना सदर गुन्ह्यात मुख्य आराेपी करावे. ज्यांनी हल्ला केला आहे त्यांच्यावर कठाेर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. अपर पाेलिस अधीक्षक अनिकेत भारती, अपर तहसीलदार सायली साेळंके यांनी आंदाेलकांशी चर्चा केली. जखमी सूर्यवंशीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पिकअप वाहन जप्त करून चाैघांना अटकही केली आहे.
पाेलिस कायदेशीर कारवाई करत असून शांतता राखा, असे भारती यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदाेलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी वाल्मीक महाराज, संदीप महाराज, राहुल बच्छाव, याेगेश गवळी, श्याम गवळी, पवन हिरे, विलास बाबा आदी उपस्थित हाेते. सहायक पाेलिस अधीक्षक तेगबिरसिंह संधू, कॅम्पचे उपअधीक्षक प्रदीप जाधव यांच्या नेतृत्वाखाली दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले हाेते.
शिर्केवर नाशकात उपचार
गंभीर जखमी असलेल्या मच्छिंद्र शिर्के यांच्यावर नाशिकला एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर दुसरा जखमी भरत सूर्यवंशीवर मालेगावात उपचार हाेत आहेत. दाेघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. दरम्यान घटनेनंतर रविवारी रात्रीच पालकमंत्री दादा भुसे यांनी शिर्के व सूर्यवंशीची भेट घेत पाेलिसांना कारवाईच्या सूचना केल्या हाेत्या.
दुचाकी धडकून अपघात
पिकअप वाहनाचा पाठलाग करताना बुलेट दुचाकी पाठिमागून पिकअपवर धडकली आहे. बुलेटचे पुढील बाजूने नुकसान झाले आहे. बुलेटला पाठिमागील कुठल्याही वाहनाने धडक दिलेले नाही. इन कॅमेरा जबाब नाेंदवून सूर्यवंशीची फिर्याद नाेंदविली आहे. त्यामुळे कुणीही अफवा पसरवू नये. कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करण्याचा इशारा पाेलिस प्रशासनाने दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.