आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यात्रोत्सव उत्साहात:बाळासाहेब बोडके कळवण‎ केसरी, प्रविण देशमुख उपविजेता‎

कळवण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ कळवण येथे सुरू असलेल्या श्री विठोबा‎ महाराज यात्रोत्सवाच्या निमित्ताने कै.‎ राजाराम पगार कुस्ती मैदानावर झालेल्या‎ कुस्ती दंगलीत कळवण केसरीचा किताब‎ नाशिकचा बाळासाहेब बोडके यांनी‎ पटकावला. तर पाचोरा येथील प्रवीण‎ देशमुख उपविजेता ठरला.

बोडके यांना ४१‎ हजार रुपये रोख व मानाची गदा पुरस्कार‎ युवा उद्योजक भूषण पगार, यात्रा कमिटीचे‎ अध्यक्ष मोतीराम पगार, सुधाकर पगार,‎ ॲड. परशुराम पगार, राजेंद्र पगार, रवींद्र‎ पगार यांच्या हस्ते देण्यात आला.‎ श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सव, श्री‎ विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट, कळवण‎ नगरपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त‎ विद्यमाने आयोजित कुस्ती दंगलीचे‎ उद‌्घाटन आमदार नितीन पवार, आमदार‎ डॉ. राहुल आहेर, माजी आमदार‎ जे.पी.गावित, नगराध्यक्ष कौतिक पगार यांनी‎ केले.

दोन दिवस चाललेल्या कुस्ती दंगलीत‎ ५०० कुस्त्या झाल्या. यामध्ये ५०१‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रुपयापासून ४१ हजार रुपयापर्यंतची कुस्ती‎ झाली. राज्यातील येवला, मनमाड, भगूर,‎ नाशिक, पुणे, कोपरगाव, सातारा, सांगली,‎ मुंबई, धुळे, जळगाव आदी ठिकाणच्या‎ कुस्तीगिरांनी हजेरी लावून यात्रेकरूंचे लक्ष‎ वेधून घेणाऱ्या कुस्त्या केल्या. यावेळी‎ रंगतदार झालेल्या कुस्ती आखाड्यात पोपट‎ पहिलवान पगार यांच्या स्मृति प्रीत्यर्थ‎ कौतिक पगार यांच्या वतीने कळवण केसरी‎ म्हणून ४१,००० रुपये व मानाची गदा‎ बक्षिसासाठी अंतिम कुस्ती झाली. यामध्ये‎ बाळासाहेब बोडके यांनी फक्त सात‎ सेकंदात प्रवीण देशमुख यांचा पराभव‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ केला.

या कुस्तीसाठी पंच म्हणून सुधाकर‎ पगार, ॲड. परशुराम पगार यांनी काम केले.‎ दोन दिवसांत या मैदानावर तब्बल ५ लाख‎ रुपयाची बक्षिसे वाटण्यात आली. यावेळी‎ किशोर पगार, रवींद्र बोरसे यांनी समालोचन‎ केले.‎ कुस्ती दंगलीमध्ये पंच म्हणून सुधाकर‎ पगार, भावराव पगार, निंबा पगार, जितेंद्र‎ पगार, नितीन पगार, राजेंद्र पगार, ॲड.‎ विनायक पगार, हरिश्चंद्र पगार, सतीश‎ पगार, भाऊसाहेब पगार, टीनू पगार, पांडा‎ पगार, गौरव पगार, अमोल पगार, मोइद्दीन‎ शेख आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...