आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल:बाप्पा पावला ; मनमाडच्या उद्योग-व्यवसायात ३० टक्के वाढीने चैतन्य

मनमाड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव व चांगल्या पावसाने गेली दोन वर्षे कोरोनामुळे ठप्प झालेल्या बाजारपेठेला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत शहरातील विविध व्यवसायांमध्ये सुमारे आठ कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. त्यात वाहन, सराफी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, तयार कपडे, किराणा, फर्निचर, मिठाई, सजावट साहित्य, तयार फ्लॅट, रो हाऊससह रिअल इस्टेटमध्ये तेजी दिसून आल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे बाजारपेठेवर असलेले मंदीचे सावट असल्याने अर्थव्यवस्थेला फटका बसला हाेता. मात्र, यंदा गणेशोत्सवात निर्बंध मुक्त वातावरणात साजरा करण्यात आल्याने व्यापार-व्यवसायांना गणपती पावल्याने व्यापार-उदीम जवळपास २५ ते ३० टक्क्यांनी वाढला. गणेशोत्सव व त्या अगोदर असलेला श्रावण मास तसेच उत्सव काळात सराफी दुकाने, वाहन उद्योग, रिअल इस्टेटसह किराणा साहित्य, तयार मिठाई आणि खाद्य पदार्थ या सर्व व्यवसायांना झळाळी प्राप्त झाली. त्यामुळे आता व्यापारी, व्यावसायिकांचा उत्साह द्विगुणीत झाला असून आगामी दसरा-दिवाळीत खरेदी मध्येही नागरिकांचा असाच दांडगा उत्साह दिसून येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

सजावट साहित्य विक्रीत वाढ
श्री गणेशोत्सवाच्या सार्वजनिक तसेच घरगुती सजावटीच्या विविध वस्तूंमध्ये सुमारे ३० टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली. सजावटी लागणारे मखर, हार, चमकी व इतर साहित्यांत नावीन्यपूर्णता आल्याने व अनेक व्हरायटीज उपलब्ध असल्याने मागील वर्षीपेक्षा ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
हिमांशू जारकड, व्यावसायिक

चांदीच्या मूर्तींना मागणी
श्रीगणेशाच्या चांदीच्या भरीव मूर्तींना मोठी मागणी होती. गणेशोत्सवात घरांतील देवघरासाठी श्री गणेशाची चांदीची मूर्ती खरेदी केली. मागील वर्षीपेक्षा सराफी व्यवसायात यावर्षी गणेशोत्सवात सुमारे २५ ते ३० टक्के वाढ झाली.
दीपक गोयल, सराफी व्यावसायिक

मावा मोदक व पेढ्यांना मागणी
श्री गणेशासाठी लागणारी मिठाई प्रामुख्याने माव्याचे मोदक व केशरी पेढे यांना अधिक मागणी होती. मागील वर्षी कोरोनामुळे कमी व्यवसाय होता. यंदा व्यवसायात ३० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसले.
राकेश बन्सल, हाॅटेल व्यावसायिक

बातम्या आणखी आहेत...