आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयात उपचार सुरू:बाेरी अंबेदरीच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम सुरू; आंदाेलकांचा जलसमाधीचा प्रयत्न

मालेगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाेरी अंबेदरी धरणाच्या बंदिस्त जलवाहिनीचे काम मंगळवारी (दि.२०) सुरू करण्यात आले. या कामास प्रारंभ हाेताच आंदाेलक आक्रमक झाले. काही आंदाेलकांनी थेट धरणाच्या दिशेने धाव घेत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान पाेलिस व आंदाेलकांमध्ये झटापट झाली. यात कल्पना राजेंद्र कचवे ही आंदाेलक महिला जखमी झाली. त्यांना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाेलिसांनी काही आंदाेलकांना ताब्यात घेतले आहे.

बंदिस्त जलवाहिनीच्या विराेधात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ४३ दिवसापासून आंदाेलन सुरू आहे. या आंदाेलनाला विराेध हाेत असताना दुसरीकडे झाेडगेत बंदिस्त जलवाहिनीच्या समर्थनात दाेनदा रास्ता राेकाे आंदाेलन झाले हाेते. या आंदाेलकांना लवकरच काम सुरू हाेईल, असे आश्वासन पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले हाेते. अखेर मंगळवारी जलवाहिनी कामाला अस्ताणे व राजमाने भागाकडून सुरुवात करण्यात आली. काम सुरू झाल्याची माहिती मिळाल्याने विराेधात आंदाेलक करणारे शेतकरी आक्रमक झाले.

त्यांनी जलसमाधी घेण्यासाठी बाेरी अंबेदरी धरणाकडे धाव घेतले. यावेळी त्यांना राेखण्यासाठी पाेलिसांची तारांबळ उडाली. पाेलिस व आंदाेलकांमध्ये काही काळ झटापट झाली. झटापटीत कल्पना कचवे या जखमी झाल्या. त्यांना तातडीने सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाेलिसांनी बळाचा वापर करुन आंदाेलकांना हटविण्याचा प्रयत्न केल्याचा आराेप करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयात काम थांबवावे यासाठी याचिका दाखल झाली आहे. मात्र, कामाला स्थगिती मिळेल या धास्तीने काम उरकण्याचा प्रयत्न हाेत असल्याचा आराेप करत आंदाेलकांना संताप व्यक्त केला आहे.

तालुक्यात हुकूमशाही
शेतकऱ्यांवर दडपशाही करुन बंदिस्त जलवाहिनीचे काम रेटण्याचे काम सुरु आहे. स्वत:ला शेतकऱ्यांचे कैवारी म्हणता, मग शेतकऱ्यांना विचारणा का करत नाही. खुल्या पाटचारीने पाणी देण्यास काय अडचण आहे. तालुक्यात दादागिरी सुरु असून ही लाेकशाही नाही तर हुकूमशाही असल्याची टिका आंदाेलक शेतकरी भूषण कचवे यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...