आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजयी:नांदूरशिंगोटेत सरपंचपद निवडणुकीत बर्के विजयी

सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या अटीतटीच्या लढतीत माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवानेते उदय सांगळे समर्थक जनसेवा पॅनलच्या शोभा दीपक बर्के या ५३ मतांनी विजयी झाल्या. ग्रामविकास पॅनलच्या लंकावती विलास सानप व अपक्ष उमेदवार अनिता अरुण शेळके यांचा पराभव झाला. सदस्यपदाच्या ११ जागांपैकी ग्रामविकास पॅनलला सहा, जनसेवाला चार तर एका प्रभागात अपक्षाने बाजी मारली.

पाच प्रभागात सदस्यपदाच्या पंधरा जागांपैकी चार जागा यापूर्वी अविरोध झाल्या होत्या. उर्वरित ११ जागांसाठी एका अपक्षासह २३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. प्रभाग १ मध्ये ग्रामविकासच्या आशा भारत आढाव (४४२) विजयी झाल्या. तर सर्वसाधारण महिला गटातून जनसेवाच्या सरला दराडे (३७१) यांनी ग्रामविकासच्या भारती शेळके (३६२) यांचा ९ मतांनी पराभव केला. तर प्रभाग २ मध्ये ग्रामविकासचे शिवराम शेळके (५०८) यांनी माजी उपसरपंच संजय शेळके (३७५) यांचा पराभव केला. तर ओबीसी महिला गटातून जनसेवाच्या ज्योती दिलीप शेळके (४३९) यांनी संगीता संदीप शेळके (४३५) यांना अवघ्या ४ मतांनी मात दिली. प्रभाग ३ मध्ये जनसेवाचे योगेश हिरामण शेळके (५६३) व शोभा उत्तम बर्के (४२३) हे विजयी झाले.

ग्रामविकासचे युवराज किसन सानप (२७१) व सिंधू बाळू शेळके (४०८) हे पराभूत झाले. प्रभाग ४ मध्ये जनसेवा व ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांचा पराभव करत अपक्ष उमेदवार सुदाम त्र्यंबक आव्हाड (४५२) हे १८० मतांनी विजयी झाले. अनिल शेळके (२७२) व नागेश शिवनाथ शेळके (१५०) यांचा पराभव झाला.

तर अनुसूचित जाती गटातून ग्रामविकासचे सुरेश कुचेकर (४६७) यांनी जनसेवाचे नीलेश कर्डक (३९९) यांचा ६८ मतांनी पराभव केला. प्रभाव ५ मध्ये ग्रामविकासचे संजय शेळके (४३२), सर्वसाधारण महिला गटातून लक्ष्मीबाई नवले (३४४), सायरा सय्यद (५२०) हे विजयी झाले. तर जनसेवाचे दत्तात्रेय सानप (२५८), आशा पठारे (३०५), ज्योती रामदास शेळके (२१०) यांचा पराभव झाला.

बातम्या आणखी आहेत...