आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुलांना हवे ते शिक्षण घेऊ द्या, आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्यावे. त्यातून त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळेल आणि आयुष्यात ते यशस्वी होतील, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे यांनी केले. सिन्नर शहरातील उद्योग भवन व शास्त्रीनगर परिसरातील पिपल्स एज्युकेशन ॲंड वेल्फेअर सोसायटी संचालित किड्झ अकॅडेमी या शाळेचा १३ वा वर्धापन दिन, वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी त्या बाेलत हाेत्या.
संस्थेच्या सचिव अनुप्रिया पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर महिला उद्योजिका सिब्बल सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्या डॉ. प्रतिभा गारे, सिन्नर महिला मंडळाच्या माजी अध्यक्षा लता पवार, संस्था अध्यक्ष, माजी प्राचार्य आर. डी. पवार, धनलक्ष्मी संस्थेचे सचिव प्राचार्य कुणाल कातकाडे, उद्योजक अजय तळेले, श्रीमंत राजे पवार घराण्याचे नाशिक जिल्हा प्रमुख आशुतोष पवार, श्री छत्रपती शिक्षण मंडळ मखमलाबादचे सचिव संजय फडोळ, केंद्रप्रमुख बाळासाहेब फड, प्राचार्या मनिषा सावखेडकर, उपप्राचार्य लक्ष्मण ढोन्नर उपस्थित होते. सरस्वती, शिव पूजन, शिव आरती तसेच राज्यगीत गायन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव'' या विषयावर कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. प्राचार्या सावखेडकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्रीडा प्रकारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा, उत्कृष्ट विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या समूहाने ४० गाण्यांच्या माध्यमातून आपले कौशल्य सादर केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी समन्वयक अभिषेक पवार, अवंतिका पवार, व्यवस्थापक सचिन गुरुळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.
५०० विद्यार्थ्यांनी सादर केली ४० गिते...
देवा श्री गणेशा या गणेश वंदनने सांस्कृतिक कार्यक्रमास प्रारंभ झाला. दैवत छत्रपती, राजे आले राजे आले, पंजाबी गाणे, मैने पायल है छानकाई, विठूरायाची नगरी, मल्हारी, काठी न घोंगड, शेतकरी गीत, आदिवासी गीत, वराह नृत्य, मी मराठी, इंग्लिश गाणे, कृष्णलीला, फुलपाखरू, आई जगदंबे, या गाण्यांसोबतच जागतिक महामारी कोविड १९ मुळे झालेल्या दुष्परिणाम वर आधारित नाटिका सादर करत करण्यात आली. एकाहून एक सरस ५०० विद्यार्थ्यांनी ४० गिते सादर केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.