आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार योजना:माळेगाव ग्रामपंचायतीस सुंदर गाव पुरस्कार

सिन्नर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील माळेगाव - मापरवाडी या ग्रुप ग्रामपंचायतीला राज्य शासनाचा आर. आर. (आबा) पाटील ‘सुंदर गाव’ पुरस्कार प्राप्त झाला आहे. तालुकास्तरावर सर्वाधिक गुण प्राप्त करून या ग्रामपंचायतीने ‘सुंदर गाव’ पुरस्कार पटकावला.

कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते नाशिक‌ रोडच्या आयुक्त कार्यालयात झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सरपंच प्रिया केशव सांगळे, ग्रामविकास अधिकारी कैलासचंद्र वाकचौरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०२१-२२ या वर्षासाठी आर. आर. पाटील ‘सुंदर गाव’ पुरस्कार योजना राबविण्यात आली होती. त्यात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुकास्तरावर माळेगाव ग्रामपंचायतने हा पुरस्कार पटकावून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा परिषदेच्या प्रशासक लीना बनसोड यांच्या स्वाक्षरीने आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्कार योजनेचे प्रमाणपत्र माळेगावला बहाल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...