आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार प्रदान:सोनवणे व कस्तुरे यांना भारत भूषण पुरस्कार प्रदान

बोरगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील धैर्यशीलराव पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक सुभाष सोनवणे व अश्विन कस्तुरे यांना भोपाळ येथे भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराबद्दल संस्थेचे सचिव अण्णा निपुंगे यांनी दोघांचे अभिनंदन केले.

नॅशनल ॲन्टी हॅरेसमेंट रजिस्टर भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक, शैक्षणिक, कृषी, कला, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुरगाण्यातील सुभाष सोनवणे, अश्विन कस्तुरे यांची निवड करण्यात आली होती. यावेळी सिनेकलाकार अरुण बक्षी, मेजर जनरल तेजपालसिंह रावत, राजेंद्रसिंह चौरसिया, प्रतिभा चौरसिया यांच्या हस्ते भारत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोनवणे व कस्तुरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल इंद्रजित गावित, गटशिक्षणाधिकारी लता भरसट, दर्शन निपुंगे, माजी महापौर अशोक दिवे, प्रकाश पगारे, एकनाथ मोरे, संजय पवार, सरपंच अशोक गवळी, प्राचार्य संजय वाघ, पर्यवेक्षक विलास जाधव, बी.एम. सुराणा, पी. आर. जाधव, रावसाहेब सूर्यवंशी, सावळीराम गायकवाड, माजी पर्यवेक्षक माणिक भांबेरे, भास्कर भोये, आनंद पडवळ, भावराव राऊत, शिक्षक, कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...