आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रापंचायतीच्या निवडणुक:पिंपळगावच्या सरपंचपदी भास्करराव बनकर

पिंपळगाव बसवंत2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपदी दिव्य विकास पॅनलचे भास्करराव बनकर यांनी संघर्ष पॅनलचे सतीश मोरे (११३) तर शहर विकास आघाडीचे गणेश बनकर यांचा पराभव केला. सदस्यपदाच्या १७ जागांपैकी दिव्य विकास पॅनलने १२, संघर्ष पॅनलने ४ तर शहर विकास आघाडीने १ जागेवर विजय मिळवला.

ग्रापंचायतीच्या निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल तयार झाल्याने काट्याची टक्कर होणार हे स्पष्ट झाले होते. दिव्य विकास पॅनलकडून सरपंचपदासाठी भास्करराव बनकर, संघर्ष पॅनलकडून सतीश मोरे तर शहर विकास आघाडीकडून गणेश बनकर यांना उमेदवारी देण्यात आली हाेती.

१७ जागांसाठी ५५ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीसाठी ३२ हजार ६५५ मतदारांपैकी २३ हजार ४८२ मतदारांनी हक्क बजावला. सरपंचपदी भास्करराव यांना ८३३५, सतीश मोरे यांना ८२२२, गणेश बनकर यांना ६०००, सीमा आहेरराव यांना ८०१, तर नोटा या पर्यायाला १२४ मते पडली. दिव्य विकास पॅनलच्या भास्करराव बनकर यांनी संघर्ष पॅनलच्या सतीश मोरे यांचा ११३ मतांनी पराभव केला.

वार्ड निहाय विजयी उमेदवार
वार्ड क्र १ :
भारत मोगल (१६०१)
छाया पाटील (१७९२)
शीतल मोरे (१८२०)

वार्ड क्र २ :
विनायक खोडे (१२७६)
केशव बनकर (१३७६)
सोनाली जाधव (१४९५)

वार्ड क्र ३ :
सत्यजित मोरे (९८१)
सावित्रीबाई गांगुर्डे (७३३)

वार्ड क्र ४ :
अमोल बागुल (२५३४)
दत्तात्रय मोरे (२४८९)
रेखा लभडे (२४७७)

वार्ड क्र ५ :
किशोर मोरे (२१४५)
हिराबाई दळवी (२२९१)
प्रतिभा बनकर (२४१६)

वार्ड क्र ६ :
दशरथ मोरे (१५३४)
सपना बागुल (१४६२)
सत्यभामा बनकर (१४५०)

चर्चेतील गावांचा निकाल
िपंपळगाव :
आमदार दिलीप बनकर यांचे गत पंचवार्षिक निवडणुकीत ग्रामपंचायतीवर वर्चस्व असतानाही यंदा त्यांच्या शहर विकास पॅनलला केवळ एका जागेवरतीच समाधान मानावे लागले आह. हा आमदार बनकर यांना धक्का मानला जात आहे.

नागापूर: नांदगाव तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून आेळख असलेल्या नागापूर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार संजय पवार यांच्या पॅनलसमाेर त्यांचे बंधू राजेंद्र पवार यांनी आव्हान उभे करत सरपंच पदावर विजय मिळविल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील माेठी ग्रामपालिका म्हणून कसबे सुकेणे ग्रामपालिका आेळ‌खली जाते. मात्र, येथे अपक्ष उमेदवाराने सरपंचपदावर बाजी मारली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पॅनलचे सदस्य पदाचे उमेदवार विजयी हाेऊनही त्यांसा सत्तेपासून दुर रहावे लागणार आहे. त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...