आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील मोठा गुरुद्वारापासून ते शिवाजी नगरमध्ये वाघदर्डी रोडवरील पांझण व रामगुळणा या दोन्ही नद्यांच्या संगमावरील नवीन पुलाचे भूमिपूजन आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते झाले. केआरटी शाळेजवळ नवनाथ मंदिराजवळील नवीन पुलाचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते झाले. सुमारे ५ कोटी रुपये खर्च करून या पुलांचे बांधकाम केले जाणार आहे. काही महिन्यांत तो पूर्ण केला जाणार आहे. पांझण-रामगुळणा या नद्यांना दरवर्षी पूर आल्यानंतर सध्या असलेल्या पुलावरून पाणी वाहू लागते व आसपासच्या घरांत जाते.
व दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प होते. त्याची दखल घेत माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे या भागातील नगरसेविका रूपाली पगारे यांच्या मागणीवरून या पुलास मंजुरी देण्यात आल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले. शिवाजी नगर भागात जाणाऱ्या व केआरटी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची या पुलामुळे मोठी सोय होणार आहे. तसेच पूर आल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना जो धोका निर्माण होतो, तो यापुढे होणार नाही, असे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे यांनी सांगितले.
कार्यक्रमास बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे तालुकाप्रमुख साईनाथ गिडगे, शहरप्रमुख मयूर बोरसे, आमिन पटेल, भाजपचे शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, मोहन गायकवाड, नारायण पवार, भाकपच्या साधना गायकवाड, विकास काकडे, दिनकर धिवर, गोविंद रसाळ, केआरटी शाळेचे मुख्याध्यापक मुकेश मिसर, अमोल नरवडे यांचेसह या भागातील नागरिक, विविध पक्षाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांचे स्वागत व सत्कार महावीर ललवाणी, राकेश ललवाणी, आमिन पटेल यांनी केले. महेंद्र वाघ यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.