आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरासाठी वरदान ठरणार असलेल्या ३१६ कोटी रुपये खर्चाच्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते येथील भगवान वाल्मीकी स्टेडियमवर सोमवारी (दि. १३) होणार असल्याची माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली. यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित राहणार आहेत. मनमाड शहरासाठी पाणीपुरवठा योजनेबरोबरच आता औद्योगिक वसाहत, शहरासाठी अद्यावत ट्रामा केअर सेंटरबाबतही सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे.
करंजवण योजनेचा हा भूमिपूजन समारंभ . मनमाड नगरपरिषदेच्या वतीने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (राज्यस्तर) अंतर्गत मनमाड शहर करंजवण धरण उद्भव असलेल्या या योजनेसाठी ३१६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देत कार्यारंभ आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर कामास वेगाने सुरुवात झाली आहे.
मनमाड शहरातील सव्वा लाख जनतेच्या अपेक्षांची पूर्ती होत असल्याचे समाधान असल्याचे आमदार कांदे यांनी सांगितले . या योजनेचे प्रत्यक्ष काम प्राथमिक स्तरावर सुरू झाले. पुढील १८ महिन्यांत ही योजना पूर्ण होईल. त्यामुळे लवकरच घराघरात या योजनेद्वारे नागरिकांना दररोज पाणी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.