आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरपालिकेचे दुर्लक्ष:मनमाड परिसरात डेंग्यूसदृश रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ ; डासांचे वाढते साम्राज्य

मनमाड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर डासांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश आजारांचे रुग्ण विविध भागांत आढळून येत आहे. वातावरणातील बदलामुळे व पावसामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. काही दिवसांपासून खोकला, ताप, साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे खासगी दवाखाने फुल्ल झाले आहेत.

काही दिवसांपासून पाऊस, ऊन आणि त्यानंतर थंडीचा जोर कमी-जास्त होत असून, वातावरणात मोठ्या प्रमाणात गारव्यासह उष्णता निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे पावसामुळे ठिकठिकाणी डबके साचून रोगराई पसरली आहे. घरामध्ये सर्दी-खोकला व इतर तापसदृश आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय तालुक्याच्या पूर्व भागात चिकुनगुन्या, टायफॉइड, मलेरियासदृश आजारांचे रुग्ण आढळून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...