आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचांदवड - मनमाड रोडवर उभ्या असलेल्या ट्रकवर रात्रीच्या सुमारास पाठीमागून दुचाकी आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चांदवड-मनमाड रोडवरील चांदवड शहरातील एचपी पेट्रोल पंपाजवळ रोडवर शनिवारी (दि. ३१) रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास ट्रक (एमएच १५ जीव्ही ७५५७) उभा केलेला होता. या ट्रकचे कोणतेही इंडिकेटर, रिफ्लेक्टर व पार्किंग लाईट लावलेले नसल्याने दुचाकीस्वार चांगदेव सखाराम पवार (४५, रा. पारेगाव ता. येवला) यांना रात्रीच्या वेळी ट्रक दिसून न आल्याने त्यांची दुचाकी (एमएच १५ जेई १५९८) ही ट्रकवर पाठीमागून आढळून ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याबाबत गणेश शिवनाथ पवार (रा. पारेगाव ता. येवला) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिल्याने पोलिसांनी ट्रकचालक बंडू बबन माळी (रा. शिरसाने ता. चांदवड) यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस नाईक भावलाल हेंबाडे करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.