आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:आडगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार

चांदवड17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील आडगाव शिवारात आडगाव टप्पाजवळ मुंबई-आग्रा महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार तरुण ठार झाला. आडगाव टप्पा येथील भीमराव महेंद्र यशवंते (३८) हा दुचाकीवर (एमएच १५ जीइ २८९९) नाशिक येथून आडगाव येथे घरी परतत असताना रविवारी दुपारच्या सुमारास आडगाव टप्पाजवळ महामार्गावर नाशिक -चांदवड लेनवर अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वार यशवंते यास गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचे नुकसान झाले. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक अपघाताची खबर न देता घटनास्थळावरून पळून गेला. याबाबत संजय सुकदेव यशवंते (रा. आडगाव टप्पा) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस नाईक एस. बी. जाधव करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...