आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती:कृषी सहायकांचे काळ्या फिती लावून कामकाज

सिन्नर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी सहायक संघटनेच्या वतीने येथील कार्यालयात कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. संघटनेच्या टप्पेनिहाय या आंदोलनाला सोमवार (दि. १) पासून सुरुवात झाली. संघटनेच्या वतीने मागण्यांचे निवेदन कृषी कार्यालयास देण्यात आले.

संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीहरी केदार, पदाधिकारी नितीन खिंडकर, प्रदीप मोरे, आबासाहेब भगत यांनी मागण्यांचे निवेदन सिन्नर कृषी मंडल अधिकारी महेश पेठेकर यांना दिले. ऑनलाइन कामकाज दिवसेंदिवस वाढत असल्याने कृषी सहायकांना संगणकीय काम करण्यासाठी लॅपटॉप देण्यात यावे, सरकारी ॲप वापरासाठी मोबाइल व्यवस्थापन खर्च व डेटा रक्कम म्हणून प्रति महिना पंधराशे रुपये देण्याची प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर ३ ऑगस्टपर्यंत काळ्या फिती लावून कामकाजात सहायक सहभागी झाले. ८ ऑगस्टला जिल्हा अधीक्षकांना निवेदन दिले जाणार आहे. १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहण सोहळ्यानंतर राज्यातील कार्यालयीन साेशल मीडियावरील ग्रुपमधून बाहेर पडणार आहेत. २२ ऑगस्ट विभागीय कृषि सहसंचालकांना निवेदन व धरणे आंदोलन, १ सप्टेंबर रोजी अॉफलाइन काम, १५ सप्टेंबरपासून आॅनलाइन कामे बेमुदत बंद करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...