आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा छापा:मालेगावी शालेय पोषण आहाराचा काळाबाजार; दोघे संशयित ताब्यात

मालेगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय पोषण आहाराचे धान्य व वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी रविवारी छापा टाकून ताब्यात घेतले. तास्कंद बाग दगडी शाळेच्या गोदामात केलेल्या कारवाईत ट्रकसह २४ लाख ४३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.शालेय विद्यार्थ्यांना मोफत पोषण आहाराचे वाटप केले जाते. मात्र, काळ्या बाजारात विक्रीच्या हेतूने पोषण आहाराचे धान्य व इतर वस्तू ट्रकमध्ये भरून नेले जात असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांना मिळाली. त्यांनी पथकास पाचारण करत छापा टाकला. पोलिसांनी संशयित उबेद बाबू शेख व ट्रक चालक प्रल्हाद सावंत यांना ताब्यात घेतले आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...