आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभासद नोंदणीचा वाद:ब्रह्मानंद संस्था सभासद नोंदणीचा वाद; दोन वेळा शाळेचे कामकाज पाडले बंद

सिन्नर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दोडी येथील ब्रह्मानंद शिक्षण संस्थेच्या सभासद नोंदणीचा वाद विकोपाला गेला आहे. सत्ताधारी अध्यक्ष आणि संचालक मंडळ ग्रामस्थांना दिलेल्या आश्वासनापासून दूर पळत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी आठवडाभरात दोन वेळा शाळेचे कामकाज बंद पाडले. अध्यक्ष, संचालक मंडळाने मात्र त्यावर चुप्पी साधली असून ते आंदोलनाकडे फिरकलेच नाहीत. उपाध्यक्ष कारभारी आव्हाड यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या बाळासाहेब वाघ यांच्यासह ग्रामस्थांशी संवाद साधत वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासद नोंदणीचा ठराव घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी दोन पावले मागे येत आंदोलन मागे घेतले.

ब्रह्मानंद शिक्षण संस्थेत ३२९ सभासद आहेत. यातील अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाच्या नऊ कुटुंबाशी निगडित २४० सभासद असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब वाघ यांनी केला आहे. गावाने उभारलेल्या शैक्षणिक संस्थेत विद्यमान अध्यक्ष पांडूशेठ केदार यांच्या कुटुंबाने ठाण मांडल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महिन्यांपूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत ग्रामस्थांनी सभासद संख्या वाढवण्याची मागणी केली होती. संचालक मंडळाची निवडणूक पार पडल्यानंतर सभासद नोंदणी करण्याचे आश्वासन दिले.

बातम्या आणखी आहेत...