आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साश्रू नयनांनी निरोप:भऊर येथील वीर जवान अविनाश पवार अनंतात विलीन

देवळा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीर जवान अविनाश पवार अमर रहे, अशा घोषणांनी भऊर (ता. देवळा) येथील सुपुत्र अविनाश केवळ पवार यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री ८ वाजता लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अविनाश पवार यांचा पाच वर्षीय मुलगा शिव याने पार्थिवाला भडाग्नी दिला. तालुक्यातील हजारो नागरिकांनी या वीर सुपुत्राला साश्रू नयनांनी निरोप दिला.

भऊर येथील अविनाश केवळ पवार गेल्या ११ वर्षांपासून २६ मराठा लाईफ इंफन्ट्री रेजिमेंटमध्ये नायक पदावर कार्यरत होते. जम्मू काश्मीर येथे देशसेवेत असताना त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी पुण्यातील सैन्यदलाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. शनिवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव गावात आणण्यात आले.

यावेळी आई, पत्नी व पाच वर्षीय मुलगा शिव यांच्यासह नातेवाइकांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. अंत्यविधी प्रसंगी प्रभारी तहसीलदार विजय बनसोडे, पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे, सैन्यदलाचे सागर पवार, जिल्हा सैनिक दलाचे शिंदे, मांगू लोखंडे, सरपंच दादा मोरे, माजी सुभेदार कारभारी पवार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. सैन्यदलाच्या देवळाली येथील आर्टिलरी सेंटरच्या जवानांनी बंदुकीच्या फैरी झाडत मानवंदना दिली.

बातम्या आणखी आहेत...