आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेरबंद:घरफोडी व दुचाकीचोर जेरबंद

लासलगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी विंचूर येथे घरफोडी करणारे दोन चोरटे तर वेळापूर येथील एका संशयिताला दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात लासलगाव पोलीसांनी अटक केली आहे.सीताबाई नाडे (रा. टाकळी विंचूर) यांच्या घरातील सुमारे १७ हजार रुपयांच्या वस्तूंची चाेरी झाल्यासंदर्भात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अपर अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी सोमनाथ तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथकाने चौकशी करत टाकळी विंचूर येथील सनी कैलास पवार (२१), निशिकांत रमेश अहिरे (२५) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता विकी देशराज शर्मा (रा. चंदनवाडी, टाकळी विंचूर) याच्या मदतीने नाडे यांच्या घराचा कडीकाेयंडा ताेडून सुमारे १६,५०० रुपये किमतीच्या घरगुती वापराच्या वस्तू चोरून नेल्याबाबत कबुली दिली आहे. शर्मा हा फरार आहे.

सहायक निरीक्षक वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजिनाथ कोठाळे, हवालदार कैलास महाजन, वाडीलाल जाधव, प्रदीप आजगे, भगवान सोनवणे, सुजय बारगळ यांचे पथकाने ही कारवाई केली.दुसऱ्या घटनेत वेळापूर येथून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात कुणाल राजोळे (२२) व भावराव सोनवणे (२८, दोन्ही रा. वेळापूर) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याबाबत कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...